GB News

महाराष्ट्राच्या राजकारणात काही शिवसेना खासदार एकनाथ शिंदे गटात सामील होणार उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

Maharashtra Politics Shivsena:  शिवसेनेत सुरू असलेले बंडखोरीचे लोण आता खासदारांमध्ये पसरण्याची चिन्हं आहेत. शिवसेनेच्या 18 लोकसभेच्या खासदारांपैकी 11 खासदार शिंदे गटात जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मुंबईतील खासदार राहुल शेवाळे यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजप प्रणित एनडीएच्या उमेदवाराला मतदान करावे अशी मागणी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना केली आहे. शिवसेनेकडून सध्या विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा दिला जाणार असल्याची शक्यता आहे. 

खासदार राहुल शेवाळे यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या या आधीच्या भूमिकेची आठवण करुन दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी याधी पक्षभेद न पाळता राज्याची कर्तृत्ववान महिला असलेल्या प्रतिभा पाटील यांनी देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान व्हावं यासाठी त्यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्याशिवाय, प्रणव मुखर्जी यांच्या कारकिर्दीचा आदर करत त्यांनाही पाठिंबा दिला होता. आता हीच परंपरा कायम ठेवावी आणि आदिवासी समाजातील एका महिलेचा सन्मान करण्यासाठी शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा केली आहे.  

मात्र, राहुल शेवाळे यांनी लिहिलेले पत्र हे निमित्त असल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे विधानसभेतील 55 पैकी 40 आमदार हे सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यानंतर आता खासदारही आपल्या बाजूने वळवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. बहुसंख्य खासदारही शिंदे गटाकडे गेल्यास मूळ शिवसेनेचा ताबा कोणाकडे याबाबतही प्रश्न निर्माण होणार आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह ‘धनुष्य बाण’ मिळवण्यासाठीदेखील शिंदे गटाचा प्रयत्न सुरू आहे. 

>> शिंदे गटात कोणते खासदार असणार?

श्रीकांत शिंदे ( कल्याण )
राजन विचारे ( ठाणे )
राहुल शेवाळे ( दक्षिण मध्य मुंबई ) 
भावना गवळी ( यवतमाळ)
हेमंत गोडसे ( नाशिक ) 
कृपाल तुमाने ( रामकेट ) 
हेमंत पाटील ( हिंगोली )
प्रतापराव जाधव ( बुलढाणा ) 
सदशिव लोखंडे ( शिर्डी )
राजेंद्र गावित ( पालघर ) 
श्रीरंग बारणे ( मावळ ) 

>> उद्धव ठाकरे यांच्यासोबत आठ खासदार

विनायक राऊत ( रत्नागिरी ) 
अरविंद सावंत ( दक्षिण मुंबई )
गजानन किर्तीकर ( उत्तर-पश्चिम मुंबई )
धैर्यशील माने ( हातकणंगले ) 
संजय मंडलिक ( कोल्हापुर ) 
कला बेन डेलकर ( दादरा नगर हवेली ) 
संजय बंदू जाधव ( परभणी ) 
ओमराजे निंबाळकर ( उस्मानाबाद)

Source link

GB News
Author: GB News

error: Content is protected !!