गोंदिया : गोंदिया जिल्याच्या गोरेगाव तालुक्यातील वन परिक्षेत्रांतर्गत येणा-या ढिमरटोली, तुमखेडा भागात तीन विदेशी दुर्मिळ सायबेरियन पक्षी जखमी अवस्थेत आढळून आले आहे .
वन विभागाने त्या तिन्ही जखमी पक्ष्यांवर प्राथमिक उपचार करून त्यांना मोकळ्या श्वसनासाठी सोडले आहे. गोंदिया जिल्ह्यात दरवर्षी हिवाळ्याची चाहुल लागताच विदेशी पक्ष्यांचा मोठ्या प्रमाणात आगमन होते हजारो कि.मी. प्रवास करून विविध प्रजातीचे विदेशी पक्षी गोंदियात जिल्हयात दाखल होतात. प्रामुख्याने गोंदिया तालुक्यातील झिलमिली, परसवाडा तर अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध, इटियाडोह या तलाव व प्रकल्प क्षेत्रात पहावयास मिळतात. त्यामुळे पक्षी प्रेमी देखील मोठ्या प्रमाणात विदेशी पक्ष्यांचे दर्शनासाठी गर्दी करीत असतात.ऑक्टोबर व नोव्हेंबर महिना पक्षी प्रेमींची आनंदाचा ठरतो. सध्या जिल्ह्यात विदेशी पक्ष्यांचे आगमन झाले आहे. मात्र गोरेगाव तालुक्यातील ढिवरटोली, तुमखेडा परिसरात तीन सायबेरियन विदेशी पक्षी जखमी अवस्थेत आढळले. या घटनेची माहिती मिळताच . वन विभागाच्या पथकाने घटनास्थळ गाठून तिन्ही जखमी पक्षांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्राथमिक उपचार केला. उपचारानंतर तिन्ही पक्ष्यांना मुक्त संचारासाठी सोडण्यात आले आहे. मात्र या घटनेमुळे विदेशी पक्ष्यांचे शिकार करणारे शिकारी सक्रिय तर झाले नाही, असा प्रश्न उपस्थित होउ लागला आहे.

Author: GB News



