GB News

हरीश मोटघरे यांनी इलेक्ट्रॉनिक मीडिया क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याने सुवर्ण पदक देऊन करण्यात आला सन्मान

 गोंदिया  09-02-2023 

 शिक्षण महर्षी स्व.मनोहरभाई पटेल जयंती निमित्त गोंदिया शिक्षण संस्थेच्या वतीने ९ फेब्रुवारी २०२३ ला मनोहरभाई पटेल यांच्या ११७ व्या जयंती निमित्त गोंदिया-भंडारा जिल्यातील गुणवंत विद्यर्थ्यांचा सत्कार करण्यात आला असून या वर्षी आयोजित सुवर्ण पदक वितरण सोहळ्यात प्रथमच गोंदिया भंडारा जिल्यात इलेक्ट्रॉनिक मीडिया क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणा?्या लोकांचा देखील सत्कार करण्यात आला असून गोंदिया सारख्या आदिवासी बहुल नक्षलग्रस्त जिल्यात इलेक्ट्रॉनिक मीडिया क्षेत्रात वर्ष २०१० पासून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, शासकीय क्षेत्रातिल बातम्या वेळोवेळी प्रकशित करून जनसामान्यांच्या मनात आपल्या कार्यशैलीतून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करणारे युवा पत्रकार हरीश मोटघरे यांना स्व मनोहरभाई पटेल यांच्या ११७ व्या जयंती निमित्त सुवर्ण पदक वितरण सोहळ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लोकनेते खा. प्रफुल्ल भाई पटेल, सिने अभिनेते जॅकी श्राफ यांच्या उपस्थित सवर्ण पदक तसेच प्रमाण पत्र देऊन गवरविण्यात आले. या कार्यक्रमात प्रसिद्धी उद्योगपती सज्जन जिंदल, माजी खा. विजय दर्डा, आमदार विनोद अग्रवाल, आमदार विजय राहगडाले, माजी मंत्री, परिणय फुके, राजकुमार बडोले, तसेच माजी आमदार राजेंद्र जैन, गोपाल अग्रवाल यांच्या सह गोंदिया भंडारा जिल्यातील अन्य मान्यवर उपस्थित होते. तर हरीश मोटघरे यांचे पदवी पर्यंत चे शिक्षण स्व मनोहर भाई पटेल यांच्या गोंदिया एजुकेशन संस्थेतून झाले असून हरीश यांनी विद्यार्थी अवस्थेत शिक्षण घेताना सवर्ण पदकाचा पाहिलेला स्वप्न त्यांनी शिक्षणा नंतर पत्रकारितेच्या माध्यमातून यांच मंचावरून प्राप्त केले असून प्रदान करण्यात आलेल्या सवर्ण पदकाचे श्रेय त्यांनी आपले मोठे बंधू गोपाल मोटघरे याना दिले असून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत गोंदिया,भंडारा जिल्यात पत्रकारिता करीत असल्याचे हरीश मोटघरे यांनी सांगितले.
 
GB News
Author: GB News

error: Content is protected !!