GB News

ऑप्टिकल इल्युजन तुम्हाला कृष्णधवल रेषांमध्ये नेमके काय दिसते हे ९९ टक्के लोक चुकले

मुंबई : हे तुमच्या डोळ्यांना जितकं सोपे दिसतंय तितकं गुंतागुंतीचं कोडं आहे. जिथे सरळ रेषा तुम्हाला तुमच्या भ्रमात अडकवतील, की त्यातून बाहेर पडणे तुमच्यासाठी कठीण होईल. डोळ्यांना फसवण्यात माहीर असलेल्या फोटोंचा भ्रम समजून घेण्यासाठी आणि सोडवण्यासाठी डोळे उघडे ठेवून पूर्णपणे सतर्क राहण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. 

मात्र यावेळी हे कोडं फारच विचित्र आहे. याचे सोडवण्यासाठी, तुम्हाला डोळे अर्धे बंद करणं आवश्यक आहे.

मिशेल डिकिन्सन यांनी त्यांच्या सोशल मीडिया ट्विटरवर काळ्या आणि पांढर्‍या रेषांसह हा फोटो शेअर केला आहे. सरळ सपाट रेषा असलेल्या फोटोमध्ये तुम्हाला एका प्राण्याचा फोटो शोधायचा आहे. 

काळ्या-पांढऱ्या रेषांमध्ये लपलेला प्राणी शोधण्याचा प्रयत्न केला तरी यश तेव्हाच मिळेल जेव्हा डोळे थोडे बंद कराल. यामध्ये डोळे थोडे उघड आणि थोडं बंद करा. आणि डोळ्यांच्या मंद प्रकाशात फोटो बघा, हे कोडे तुम्हाला तेव्हा समजेल.

याशिवाय, हा फोटो तुम्हाला थोडा खाली स्क्रोल करावा लागेल. ही मदत हा Optical Illusion समजून घेण्यासाठी पुरेशी असेल. तरीही तुम्हाला जमलं नसेल तर या फोटोमध्ये मांजराचा फोटो दिसेल. 

हे Optical Illusion चं एक नवीन रूप आहे, ज्यामध्ये 3D प्रतिमा लपविण्यासाठी ठिपके किंवा रेषा वापरल्या जातात.

Source link

GB News
Author: GB News

error: Content is protected !!